कंबरदुखीवर फक्त तेल मालिश पुरेशी आहे का? की आधी योग्य निदान आवश्यक आहे?

Posted by

·

डॉ. सुप्रिया चौधरी यांचा वैद्यकीय दृष्टिकोन – प्रत्येक कंबरदुखीचा उपचार सारखा नसतो.

आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कंबरदुखीचा त्रास आहे.

पण प्रत्येक कंबरदुखीचे कारण एकच नसते.

  • स्नायूंचा ताण?
  • डिस्क प्रोलॅप्स?
  • सायटिका?
  • स्पाइनल कॅनल स्टेनोसिस?
  • ऑस्टिओपोरोसिस?
  • मूत्रपिंडाशी संबंधित वेदना?
  • स्त्रियांच्या स्त्रीरोगांमुळे होणारी कंबरदुखी?

म्हणूनच एकाच प्रकारचे तेल, मालिश किंवा पंचकर्म सर्वांसाठी योग्य असू शकत नाही.

स्वप्नदीप आयुर्वेद भवनमध्ये आम्ही प्रथम कारण शोधतो, नंतर उपचार ठरवतो.

डॉ. सुप्रिया चौधरी यांच्याकडून:

✔ सविस्तर इतिहास

✔ शारीरिक तपासणी

✔ आवश्यक असल्यास MRI/X-ray चे विश्लेषण

✔ न्यूरोलॉजिकल तपासणी

✔ आयुर्वेदीय दोष व प्रकृती परीक्षण

✔ दैनंदिन जीवनशैलीचे मूल्यमापन

त्यानंतरच उपचार ठरवले जातात.

प्रत्येकाला पंचकर्म आवश्यक नसते

हे आमचे तत्त्व आहे.

काही रुग्णांना – औषधे , व्यायाम , वजन नियंत्रण , योग्य बसण्याची पद्धत इतक्यानेच आराम मिळतो.

काहींना – कटी बस्ती ,बस्ती चिकित्सा , पत्रपिंड स्वेद , कटी अभ्यंग , अग्निकर्म (योग्य रुग्णात) यांचा फायदा होतो.

तर काही रुग्णांना तातडीने ऑर्थोपेडिक किंवा न्यूरोसर्जनकडे पाठवणे आवश्यक असते.

योग्य रुग्ण निवडणे हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

आम्ही MRI का पाहतो?

कारण प्रत्येक स्लिप डिस्कला शस्त्रक्रिया लागत नाही.आणि प्रत्येक स्लिप डिस्क आयुर्वेदाने बरीही होत नाही.

आम्ही रुग्णाला स्पष्ट सांगतो:

  • कुठल्या अवस्थेत आयुर्वेद उत्तम मदत करू शकतो.
  • कुठे फक्त वेदना कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
  • कुठे शस्त्रक्रिया विलंबित होऊ शकते.
  • आणि कुठे शस्त्रक्रिया टाळणे सुरक्षित नाही.

ही प्रामाणिक भूमिका आमच्यावरचा रुग्णांचा विश्वास वाढवते.

कोणाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

जर खालीलपैकी काही लक्षणे असतील तर विलंब करू नका:

  • पायात तीव्र कमजोरी
  • लघवी किंवा शौचावर नियंत्रण कमी होणे
  • तापासोबत कंबरदुखी
  • अपघातानंतर वेदना
  • रात्री वाढणारी असह्य वेदना
  • कर्करोगाचा पूर्व इतिहास

अशा परिस्थितीत तातडीचे वैद्यकीय मूल्यांकन आवश्यक असते.

आयुर्वेदाने कंबरदुखीत कशी मदत होऊ शकते?

  • वेदना व सूज कमी करण्यास मदत
  • स्नायू व सांध्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत
  • मणक्याभोवतीच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत
  • हालचालीतील अडथळे कमी करण्यास मदत
  • शरीरातील वातदोष संतुलित करण्यास मदत
  • पुन्हा पुन्हा होणाऱ्या कंबरदुखीचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैली मार्गदर्शन
  • शस्त्रक्रिया आवश्यक नसलेल्या निवडक रुग्णांमध्ये लक्षणे नियंत्रित ठेवण्यास मदत
  • वेदनाशामक औषधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पूरक उपचार (योग्य रुग्णांमध्ये)

आमचे उद्दिष्ट फक्त वेदना कमी करणे नाही. आमचे उद्दिष्ट आहे योग्य निदान, योग्य रुग्ण आणि योग्य उपचार.

Dr Chaudhari's Swapnadeep Ayurveda -AYUXPRESS Avatar

About the author